Friday, May 1, 2020

"वेळ"©

मराठी कविता ऐकायला आवडणाऱ्या मित्र मैत्रिणींना हेमाचा सप्रेम नमस्कार ... आता जी कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे ती आहे वेळे संधर्भात .. आपल्या आयुष्यातील बराचसा वेळ  आपण नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वाया घालवत असतो .. कधी कधी तर ज्या लोकांना आपल्याशी काडीमात्र देणे घेणे नाही अशा लोकांचा विचार करण्यात आपला संपूर्ण दिवस आपण खर्च करतो ... आणि आपल्या मनात असणाऱ्या सुंदर बागेत आपणच वादळे घेऊन येतो ... आपल्याकडून केल्या जाणाऱ्या विचारांमुळे आपले मन आनंदी  किंवा दुःखी होत असते ... त्यामुळे आनंदी राहण्यासाठी कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे आपणच ठरवायला हवं ... आपला ९९% आनंद हा आपल्या विचारात दडलेला असतो ... त्यामुळे स्वतःला स्वतःसाठी वेळ देण्याची सवय आपण करून घ्यायला पाहिजे ... या संदर्भातच छोटीशी कविता नक्की ऐका ...



कधीतरी वेळ काढून प्रत्येकाने 
स्वतःलाच वाचून पहायला हवं 
मनातल्या बंद कप्याना 
अलगद उलगडून पाहायला हवं 

कधीतरी वेळ काढून प्रत्येकाने 
स्वतःलाच समजून सांगायला हवं 
मिळणाऱ्या गोष्टीत समाधान मानून 
आपणच आपल्याला जगणं शिकवायला हवं 

आपल्या नशिबात असणारी प्रत्येक गोष्ट 
आपल्याला मिळणारच असते 
फक्त "आपलं" कशाला म्हणायचं
हे आपण  ठरवायला हवं .....

Hema yadav  ©

Do Not Copy Its Under Copyright ©



No comments:

Post a Comment

"निस्तब्ध"