Friday, May 1, 2020

" आठवण "©

" आठवण "

काही कारणास्तव आवडत्या व्यक्तीच्या सोबत आपल्याला राहता येत नाही , पण त्या व्यक्तीच्या आठवणीत आपल्याला राहता यावे अशी इच्छा आपल्या मनात कुठेतरी असतेच ना ? चला त्यांना विचारून पाहूया " माझी आठवण काढशील का? " 


तुझ्या आयुष्यात नाही , 
पण तुझ्या मनात छोटीशी 
जागा मला देशील का?
कधीतरी एकातांत असताना,
माझी आठवण काढशील का?

रोज हातात हात नको 
पण एक खंबीर आधार 
म्हणून एकदा मला 
कुशीत घेशील का ?
कधीतरी एकातांत असताना,
माझी आठवण काढशील का?

सोबत नको राहू , पण 
हक्काने एकदा तरी , 
"मी फक्त तुझी आहे "
हे साऱ्या जगाला सांगशील का ? 
कधीतरी एकातांत असताना,
माझी आठवण काढशील का?


Hema yadav  ©

Do Not Copy Its Under Copyright ©

1 comment:

"निस्तब्ध"