" Marathi Kavita , charoli , message "
मनातील मुक्या भावनांना शब्दांच्या माळेत गुंफले कि एक सुंदर कविता तयार होते , मला कवितेतून व्यक्त व्हायला आवडते , मी लिहिलेल्या काही मला आवडलेल्या कविता मी या ब्लॉग वर लिहीत आहे , तुम्हाला हि जर या कविता आवडल्या तर नक्की कळवा , धन्यवाद .
Monday, December 14, 2020
Monday, November 9, 2020
" शब्दचं घात करतात .... " "words can kill you"
शब्दचं घात करतात ....
शब्द आपल्या जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात , आपल्या कळत - नकळत शब्दच आपले यश आणि अपयश ठरवतात .. हि कविता त्याच अल्लड , अवखळ , आणि खडूस शब्दांसाठी ....."
Thursday, October 29, 2020
Monday, October 5, 2020
Sunday, September 20, 2020
Friday, May 1, 2020
"वेळ"©
मराठी कविता ऐकायला आवडणाऱ्या मित्र मैत्रिणींना हेमाचा सप्रेम नमस्कार ... आता जी कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे ती आहे वेळे संधर्भात .. आपल्या आयुष्यातील बराचसा वेळ आपण नको त्या गोष्टींचा विचार करण्यात वाया घालवत असतो .. कधी कधी तर ज्या लोकांना आपल्याशी काडीमात्र देणे घेणे नाही अशा लोकांचा विचार करण्यात आपला संपूर्ण दिवस आपण खर्च करतो ... आणि आपल्या मनात असणाऱ्या सुंदर बागेत आपणच वादळे घेऊन येतो ... आपल्याकडून केल्या जाणाऱ्या विचारांमुळे आपले मन आनंदी किंवा दुःखी होत असते ... त्यामुळे आनंदी राहण्यासाठी कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे आपणच ठरवायला हवं ... आपला ९९% आनंद हा आपल्या विचारात दडलेला असतो ... त्यामुळे स्वतःला स्वतःसाठी वेळ देण्याची सवय आपण करून घ्यायला पाहिजे ... या संदर्भातच छोटीशी कविता नक्की ऐका ...
कधीतरी वेळ काढून प्रत्येकाने
स्वतःलाच वाचून पहायला हवं
मनातल्या बंद कप्याना
अलगद उलगडून पाहायला हवं
कधीतरी वेळ काढून प्रत्येकाने
स्वतःलाच समजून सांगायला हवं
मिळणाऱ्या गोष्टीत समाधान मानून
आपणच आपल्याला जगणं शिकवायला हवं
आपल्या नशिबात असणारी प्रत्येक गोष्ट
आपल्याला मिळणारच असते
फक्त "आपलं" कशाला म्हणायचं
हे आपण ठरवायला हवं .....
Hema yadav ©
Do Not Copy Its Under Copyright ©
" आठवण "©
" आठवण "
काही कारणास्तव आवडत्या व्यक्तीच्या सोबत आपल्याला राहता येत नाही , पण त्या व्यक्तीच्या आठवणीत आपल्याला राहता यावे अशी इच्छा आपल्या मनात कुठेतरी असतेच ना ? चला त्यांना विचारून पाहूया " माझी आठवण काढशील का? "
तुझ्या आयुष्यात नाही ,
पण तुझ्या मनात छोटीशी
जागा मला देशील का?
कधीतरी एकातांत असताना,
माझी आठवण काढशील का?
रोज हातात हात नको
पण एक खंबीर आधार
म्हणून एकदा मला
कुशीत घेशील का ?
कधीतरी एकातांत असताना,
माझी आठवण काढशील का?
सोबत नको राहू , पण
हक्काने एकदा तरी ,
"मी फक्त तुझी आहे "
हे साऱ्या जगाला सांगशील का ?
कधीतरी एकातांत असताना,
माझी आठवण काढशील का?
Hema yadav
©
Do Not Copy Its Under Copyright ©
Subscribe to:
Posts (Atom)
-
" आठवण " काही कारणास्तव आवडत्या व्यक्तीच्या सोबत आपल्याला राहता येत नाही , पण त्या व्यक्तीच्या आठवणीत आपल्याला राहता यावे अश...